kangana ranaut
देश

अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकार देणार Y दर्जाची सुरक्षा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. वाय दर्जाची सुरक्षा ही व्हीआयपीला दिलेली तिसऱ्या स्तरावरील सुरक्षा आहे. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी असतात तर एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ समाविष्ट असतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विशेष म्हणजे या परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेश सरकारनेदेखील कंगनाला सुरक्षा दिली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील कंगनाला सुरक्षा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

कंगना ने ट्विट करत म्हटलं कि, ‘आता देशप्रेमाच्या आवाजाला कुणीही फाशीवादी दाबू शकणार नाही, ‘अमित शहांनी भारताच्या मुलीचे शब्द व स्वाभिमान राखला.’

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत