दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राने चेन्नईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती २८ वर्षांची होती. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. नैराश्यातून चित्राने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. चित्राचा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर हे दोघं एकत्रदेखील रहात होते. मात्र, अचानकपणे चित्राने चेन्नईतील नसरपेट […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
अभिनेत्री क्रिती सेनॉनला कोरोनाची लागण
अभिनेत्री क्रिती सेनॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. क्रिती मागील आठवड्यात चंडीगडमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीने सोमवारीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. पण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन
मुंंबई : टीव्ही विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’ मालिकेत ‘गुलाबो’ची भूमिका करणाऱ्या दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्ण्लयात उपचार सुरु होते. दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याला […]
सिने-नाट्य सृष्टीतील भारदस्त व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने “भारदस्तपणा” मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला आहे. दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. […]
ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक […]
‘जुग जुग जिओ’ सिनेमाच्या सेटवर वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण
चंदिगड : ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे. सेटवर एकदम १९ जणांना कोरोना झाल्यामुळे […]
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांची आत्महत्या
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अभिषेक मकवाना यांना कर्ज घेतल्यापासून फोनवरुन धमक्या दिल्या जात होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. अभिषेक […]
कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद करा, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल
मुंबई : एका वकिलाने मुंबई हायकोर्टात कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट बंद करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. कंगना वादग्रस्त ट्वीटद्वारे देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गुरुवारी ट्विटरवर अभिनेत्री कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझ यांच्यात ट्विटर वॉर चालू होते. यामुळे […]
बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले […]
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर
अमलीपदार्थ प्रकरणात जवळपास तीन महिन्यांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने शौविकला सशर्त जामीन मंजूर केला आहे. रिया चक्रवर्तीसह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांसंबंधी रिया व सॅम्युएल यांच्यातील चॅटची माहिती मिळाली […]










