Bollywood drugs case: Suspension of two NCB officials

बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन

मनोरंजन महाराष्ट्र

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांच्या जामिनादरम्यान एनसीबीची टीम न्यायालयात हजर झाली नव्हती. तसंच त्यांच्या जामिनाला विरोध देखील केला नव्हता. त्यानंतर हर्ष आणि भारती सिंग यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएस कोर्टाकडे अपील केले की खालच्या कोर्टाने दिलेला जामीन आणि भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचा ड्रग्समध्ये असलेला सहभाग लक्षात घेवून त्यांचा जामीन रद्द करावा. या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे.

एनसीबीने छाप्यामध्ये करिश्मा प्रकाशच्या घरून ३ सीबीडी तेल आणि गांजा जप्त केला होता, त्यानंतर अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता. तिचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला त्यामुळे ती जामिनावर बाहेर आहे. या प्रकरणात देखील तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळली. त्यामुळे विभागीय संचालक समिर वानखेडे यांच्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत