Actress Divya Bhatnagar dies
मनोरंजन

अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं कोरोनामुळे निधन

मुंंबई : टीव्ही विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’ मालिकेत ‘गुलाबो’ची भूमिका करणाऱ्या दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर मुंबईतील गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्ण्लयात उपचार सुरु होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्याला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिची ऑक्सिजनची पातळी ७१ पर्यंत खाली आली होती. २८ नोव्हेंबरला तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिला न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली. ज्यामुळे तिचे निधन झाले. दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी याने तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युवराजने सांगितले की, ‘दिव्याचं निधन आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाले. दिव्याला ७ हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री २ वाजता अचानक तिची प्रकृती अधिक बिघडली. तिला श्वास घेण्यास बराच त्रास होत होता, त्यानंतर ३ वाजता तिचं निधन झालं. ही बातमी माझ्यासाठी आणि दिव्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का आहे.’

दिव्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हां कभी नां, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से, तेरा यार हूं यासारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत