मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली. रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाणे येथे राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्यामुळे ते नोकरी सांभाळून नाटक करू शकले.
वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. रवी पटवर्धन यांनी आईची सेवा करता यावी यासाठी लग्न केले नाही.