IND vs AUS 2nd T20I

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा T२० सामना

क्रीडा

IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा T२० सामना दुपारी १.४० पासून रंगणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वर करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचा कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास उंचावणार आहे. पुढील दोन्ही ट्वेन्टी-२० सामने जिंकून कसोटी मालिकेसाठी सज्ज होण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘कन्कशन’च्या नियमामुळे जडेजाच्या हेल्मेटवर चेंडू आदळल्यामुळे त्याच्या जागी युजवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने गोलंदाजीत आपली छाप पाडत भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयी संघात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले आहेत. सलामीला संधी मिळालेल्या लोकेश राहुलने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या विजयात योगदान दिले. सलामीवीर शिखर धवन त्याचबरोबर कोहलीकडून दमदार कामगिरी अपेक्षित आहे. संजू सॅमसन आणि हार्दिक पंडय़ा यांच्याकडून मोठय़ा फटकेबाजीची आशा आहे.

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरने ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली असून त्यातच आता कर्णधार ऍरॉन फिंचच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याने फिंचच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन आणि शार्दूल ठाकूर

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, मिचेल स्वीपसन, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन लायन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत