मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे वृद्धापकाळामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे मंगळवारी(२८ जुलै) वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या मातोश्री . ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘खडाष्टक’, ‘भाऊबंदकी’, ‘सुंदर मी होणार’, ‘शारदा’, ‘गरुडझेप’, ‘पंडित राज जगन्नाथ’ अशा अनेक […]

मनोरंजन

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे […]

मनोरंजन

सुशांतने अभिनेत्रीसोबत सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही, स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मध्यंतरी सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र याप्रकरणी संजनानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनेदेखील मौन सोडलं आहे. ‘सुशांतने सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही’, असं तिने ‘पिंकव्हिला’सोबत बोलताना सांगितलं आहे. “सेटवर असताना सुशांतने संजनासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. […]

मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, मोदींनी दिलं केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राला उत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला एक महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांची चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. परिणामी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत एक पत्र देखील लिहिलं होतं. त्यांच्या या […]

मनोरंजन

‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांत अश्रू

अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. “प्रिय सुशांत सिंह राजपुत, दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला. भौतिक जगात तू आमच्यासोबत नाहीस याचं कायम दु:ख राहिल. तुझा हा चित्रपट आम्ही मनापासून पाहू. हा चित्रपट पाहून आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील. आम्हाला तुझी कायम आठवण येईल.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम […]

मनोरंजन

सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.