मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे वृद्धापकाळामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचे मंगळवारी(२८ जुलै) वांद्रे येथील निवासस्थानी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़दिग्दर्शक दामू केंकरे यांच्या पत्नी आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या मातोश्री .

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘तुझे आहे तुजपाशी’, ‘खडाष्टक’, ‘भाऊबंदकी’, ‘सुंदर मी होणार’, ‘शारदा’, ‘गरुडझेप’, ‘पंडित राज जगन्नाथ’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी काम केले होते. ललिता केंकरे यांनी पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, विद्याधर गोखले, तात्यासाहेब शिरवाडकर अशा दिग्गजांच्या नाटकांमधून भूमिका साकारल्या. ‘पती गेले गं काठेवाडी’ हे त्यांचे नाटक विशेष गाजले. भालचंद्र पेंढारकर, श्रीकांत मोघे, मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी अनेक नाटकांमधून काम केले.

एकपाठी अभिनेत्री म्हणून त्या विशेष प्रसिद्ध होत्या. दामू केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका के ल्या होत्या. सई परांजपे दिग्दर्शित ‘कथा’ चित्रपटातही त्यांची भूमिका होती. जयवंत दळवी यांच्या ‘दुर्गी’ या नाटकावर आधारित ‘सावल्या’ या मालिके तूनही त्यांनी काम केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत