Riya Chakraborty appeared in the trailer of the movie 'Chehre'

‘चेहरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली, पण…

मनोरंजन

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा सर्वत्र केली जात होती. पण, ट्रेलरमध्ये रिया दिसत आहे. 2 मिनिट 22 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये केवळ 2 सेकंद रिया चक्रवर्तीची झलक दाखवण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इमरान हाश्मीने इंस्टाग्रामवर ‘चेहरे’चा ट्रेलर शेअर करताना लिहिले की, ‘दोष सिद्ध होईपर्यंत प्रत्येकजण संशयित असतो. आपण तयार आहात खेळाचा सामना करायला?’

‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडने केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चॅटर्जी, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत