Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack

सिद्धार्थ शुक्ला दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता, पण तिसऱ्यांदा…

मनोरंजन

मुंबई : ‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला आणि बिग बॉस १३ या रियॅलिटी शोचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. याबाबत मुंबईतील कुपर रुग्णालयाने माहिती दिली आहे. बुधवारी रात्री त्याने त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याने काही औषधे घेतली होती आणि झोपायला गेला होता. त्यानंतर झोपेतंच त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वाला धक्का बसला असून या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. अनेक सेलिब्रिटींनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिद्धार्थ शुक्ला यापूर्वी दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता. २०१४ मध्ये रस्ते अपघातातून सिद्धार्थ बचावला होता. त्यानंतर २०१८ मध्ये सिद्धार्थच्या कारला मोठा अपघात झाला होता. सिद्धार्थच्या भरधाव कारने तीन गाड्यांना धडक दिली होती. त्यानंतर त्याची कार दुभाजकावर चढली होती. या अपघातात सिद्धार्थ आणि अन्य चार जण जखमी झाले होते. त्यावेळी सिद्धार्थ थोडक्यात बचावला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत