मुंबई : एका वकिलाने मुंबई हायकोर्टात कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट बंद करा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. कंगना वादग्रस्त ट्वीटद्वारे देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
गुरुवारी ट्विटरवर अभिनेत्री कंगना रनौत आणि दिलजीत दोसांझ यांच्यात ट्विटर वॉर चालू होते. यामुळे ट्विटरवर अनेक हॅशटॅगही ट्रेंड करत होते. आता मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. कंगनाचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याबद्दल कंगनानेही सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कंगना तिच्या ट्विटर अकाऊंटवरून वारंवार तिरस्कार, वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सदर याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर कंगनाने प्रतिक्रिया देत एक ट्विट केलं आहे. ‘मी रोज अखंड भारताबद्दल बोलत आहे. रोज मी तुकडे-तुकडे टोळीशी लढत आहे. तरीही माझ्यावरच देशाचं विभाजन केल्याचा आरोप होत आहे. व्वा! तरीही, माझ्यासाठी ट्विटर हे एकमेव प्लॅटफॉर्म नाही. एका इशाऱ्यात हजारो कॅमेरे माझ्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येतील हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझा आवाज दाबण्यासाठी तुम्हाला मला मारावं लागेल. पण त्यानंतर मी प्रत्येक भारतीयांच्या माध्यमातून बोलेन आणि हेच माझं स्वप्न आहे. तुम्ही काहीही केलं तरी माझं स्वप्न आणि ध्येय साकार होईल. म्हणूनच मला खलनायक आवडतात.’ असं कंगनाने म्हटलं आहे.
So tukde gang remember you will have to kill me to suppress my voice, and then I will speak through every Indian and that’s precisely my dream, whatever you do inevitably you will make me realise my dream and purpose and that’s why I respect my villains ❤️
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020