अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. रकुल हैदराबादमध्ये अजय देवगन आणि अमिताभ बच्चन अभिनीत आगामी मेडे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. रकुलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली. रकुलने ट्विट करत म्हटले कि, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. मला बरे वाटत आहे आणि विश्रांती […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
ड्रग्ज प्रकरण : अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ
ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची अडचण वाढू शकते. आज (21 डिसेंबर) अर्जुन रामपाल पुन्हा एनसीबीसमोर हजर झाला. या प्रकरणात एनसीबीने दिल्लीच्या डॉक्टरांची चौकशी केली आहे. एनसीबीने न्यायालयात 164 अंतर्गत न्यायाधीशांकडेही डॉक्टरांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात डॉक्टर म्हणाले कि, ‘ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी एनसीबीला सांगितल्या आहेत आणि माझे निवेदन दंडाधिकाऱ्यांसमोर […]
कधीच विचार केला नव्हता की असा दिवस येईल, आणि… सुशांतच्या आठवणीत अंकिता भावुक
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आता ६ महिने होऊन गेले आहेत. परंतु, अजूनही चाहते सुशांतला विसरलेले नाहीत. अंकिता लोखंडेने देखील सुशांत विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘झी रिश्ते अवॉर्ड’ मध्ये अंकिताने तसेच उषा नाडकर्णी यांनी परफॉर्मन्स दिला आणि सुशांतची आठवण काढली. यावेळी अंकिता म्हणाली कि, कधीच विचार केला नव्हता कि, असा दिवस येईल आणि नेहमी […]
नेहा कक्कर प्रेग्नंट नाही, नेहाने स्वतः केला खुलासा
गायिका नेहा कक्करने नवरा रोहनप्रीत सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत होतं. त्यामुळे नेहा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसंच नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती, असंही म्हटलं जात होतं. मात्र, नेहाने या चर्चांना पूर्णविराम देत ती प्रेग्नंट नसून तिने हे सारं तिच्या आगामी गाण्यासाठी केल्याचा खुलासा केला आहे. […]
अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण
मुंबई : प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केले आहेत. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. मला डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मी नाटकाचे दोन प्रयोग रद्द केले आहेत. पिंपरीचा प्रयोग करुन […]
ब्रेकिंग : NCB ने करण जोहरला बजावले समन्स, ड्रग्स प्रकरणात होणार चौकशी
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चित्रपट निर्माता करण जोहर यांना समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबी करण जोहरची बॉलीवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याबद्दल चौकशी करणार आहे. परंतु, एनसीबी कार्यालयात करण यांना कधी चौकशीसाठी हजर राहायचे हे अद्याप समजू शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचा दुसरा फॉरेन्सिक अहवालही नकारात्मक आला. या व्हिडिओबद्दल असे […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं, रिपोर्टमध्ये समोर आलं मृत्यूचं कारण
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. तिच्या मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणात रक्त असल्यामुळे आर्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यात तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी आर्याचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आला होता. त्यानंतर तिच्या शवविच्छेदन अहवालात आर्याने मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]
कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक अहमद खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी लीजेल आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन..
पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी पहाटे, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वे नगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी साडेनऊ वाजता ठेवण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पाश्चात आई ,वडील , पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीयरची […]










