Neha Kakkar is not pregnant

नेहा कक्कर प्रेग्नंट नाही, नेहाने स्वतः केला खुलासा

मनोरंजन

गायिका नेहा कक्करने नवरा रोहनप्रीत सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत होतं. त्यामुळे नेहा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसंच नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती, असंही म्हटलं जात होतं. मात्र, नेहाने या चर्चांना पूर्णविराम देत ती प्रेग्नंट नसून तिने हे सारं तिच्या आगामी गाण्यासाठी केल्याचा खुलासा केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. नेहाच्या आगामी गाण्याचं नाव ‘खयाल रख्या कर’ असं असून हे गाणं २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

१८ डिसेंबरला नेहाने रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसत होतं. त्यासोबतच तिने खयाल रख्या कर असं कॅप्शन दिलं होतं. तर रोहनप्रीतनेदेखील “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट केली होती. त्यामुळे नेहा गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नेहाने तिच्या पोस्टमध्ये ती प्रेग्नंट असल्याचा उल्लेख कुठेही केला नव्हता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत