Book LPG cylinder from Paytm and get Rs.500 cashback

LPG सिलिंडर पेटीएम वरून बुक करा, 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या प्रक्रिया

देश

पेटीएम वरून एलपीजी सिलिंडर बुक करुन आता आपण 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. पेटीएमने ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅपवरून एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर केली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्‍या ग्राहकांनाच घेता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कोड वापरावा लागेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही ऑफर मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रोमो विभागात ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड टाकावा लागेल. ग्राहक या पेटीएम ऑफरचा फक्त एकदा वापर करू शकतात. ही ऑफर 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध आहे.

या ऑफरचा अशा प्रकारे फायदा घ्या :

  1. सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर पेटीएम अ‍ॅप उघडा.
  2. आता ‘show more ‘ वर क्लिक करा.
  3. आता डाव्या हाताच्या असलेल्या कॉलममधून ‘Recharge and Pay Bills’ वर क्लिक करा.
  4. आता ‘Book a सिलेंडर’ आयकॉनवर क्लिक करा.
  5. आता आपल्याला आपल्या गॅस प्रोव्हायडरचा पर्याय निवडावा लागेल. येथे आपल्याला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय दिसतील.
  6. आता आपल्याला नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा एलपीजी आयडी किंवा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल.
  7. आता प्रोसिड वर क्लिक करावं लागेल. आपण इथे गॅस सिलिंडरसाठी आकारले जाणारे शुल्क बघू शकाल.
  8. पेटीएम गॅस बुकिंग करण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमोकोड वापरा आणि ऑफरचा लाभ मिळवा.

जर आपण आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा आपण आपली मासिक वॉलेट मर्यादा ओलांडली असेल तर आपल्याला गिफ्ट व्हाउचरमध्ये कॅशबॅक मिळेल. पेटीएम या ऑफरवर कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत