IND vs AUS 1st test match Day 3
क्रीडा

IND vs AUS 1st test match Day 3 : टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑल आऊट

IND vs AUS 1st test match Day 3 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट मॅच एडिलेडमध्ये सुरू असून आज मॅचचा तिसरा दिवस आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची अवस्था बिकट झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मॅचच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात टीम इंडियाने 9/1 ने केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही रन्सवर माघारी परतली. सर्वप्रथम जसप्रीत बुमराह दोन रन्सवर आऊट झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा शून्यावर तर मयंक अगरवाल नऊ रन्सवर माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणे शून्यावर आऊट झाला. त्यांनतर कॅप्टन विराट कोहलीने एक फोर मारत स्कोअर थोडा वाढवला आणि चार रन्स करुन माघारी परतला. टीम इंडिया अवघ्या 36 रन्सवर ऑल आऊट झाली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी अवघ्या 90 रन्सचं आव्हान आहे.

मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाने 244 रन्स केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन विराट कोहलीने सर्वाधिक 74 रन्स केले. चेतेश्वर पुजाराने 43 तर अजिंक्य रहाणे याने 42 रन्स केले. टीम इंडिया 244 रन्सवर ऑल आऊट झाल्यावर ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात उतरली. ऑस्ट्रेलियाकडून टीम पेन याने 99 बॉल्समध्ये नॉट आऊट 73 रन्सची खेळी खेळली. मात्र, त्याला इतर बॅट्समनकडून चांगली साथ मिळाली नाही आणि टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 191 रन्सवर रोखलं. टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विन याने 18 ओव्हर्समध्ये 55 रन देत चार विकेट्स घेतल्या. उमेश यादवने 16.1 ओव्हर्समध्ये 40 रन देत तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने 21 ओव्हर्समध्ये 52 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमीने 17 ओव्हर्समध्ये 41 रन दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत