मुंबई : प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केले आहेत. फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
मला डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मी नाटकाचे दोन प्रयोग रद्द केले आहेत. पिंपरीचा प्रयोग करुन आल्यानंतर मला कणकण जाणवली असंही प्रशांत दामले यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारची परवानागी मिळाल्यानंतर १२ डिसेंबरला पुण्यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला होता. तसंच चिंचवडलाही एक प्रयोग झाला होता. यानंतर प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बुधवारी कोरोनाची चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.