कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नड स्पर्धक जयश्री रमैया यांचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला आहे. आज (25 जानेवारी) जयश्रीचा मृतदेह बंगळुरूमधील पुनर्वसन केंद्रात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती. जयश्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जयश्रीने सोशल मीडियावरही अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर ती […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
दुःखद : ‘चलो बुलावा आया है’ फेम प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे आज (शुक्रवारी) दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते आणि दिल्लीच्या सरिता विहारमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालय प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 27 नोव्हेंबरपासून गायक नरेंद्र चंचल यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालय […]
विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन; बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. “आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही […]
केजीएफ 2 चा टीझर रिलीज, दमदार अंदाजात परतला ‘रॉकी’
मुंबई : होमबेल फिल्म्स, एए फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेन्मेंटकडून 2021च्या नव्या वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भेट मिळालीय. नवीन वर्षाची सुंदर सुरुवात करून या प्रॉडक्शन हाऊसेसने त्यांच्या केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) या चित्रपटाचा टीझर दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच रिलीज केला. यंदा प्रदर्शित होणारा केजीएफ 2 चित्रपटाचा टीझर सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट स्वरूपात 8 […]
मनोज तिवारी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, ट्विट करत म्हटले ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’…
नवी दिल्ली : भाजपाचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी वडील झाले आहेत. त्याच्या घरी बुधवारी मुलीचा जन्म झाला. तिवारी यांनी स्वत: ट्वीटद्वारे ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, घरात एक लहान देवदूत आला आहे. या बातमी नंतर मनोज तिवारी यांचे ट्विटरवर अभिनंदन होऊ लागले आहे. सर्वानी […]
प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा चित्रीकरणादरम्यान धरणात बुडून मृत्यू
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा मृत्यू झाला आहे. ४८ वर्षीय अनिल केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीसाठी गेले होते. धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे थोडुपुझा इथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सीन संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने ब्रेक घेतला तेव्हा अनिल आपल्या काही मित्रांसह धरणात आंघोळीसाठी गेले. याचवेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. […]
जॉन अब्राहमला ‘सत्यमेव जयते 2’ च्या सेटवर दुखापत
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला ‘सत्यमेव जयते 2’ च्या सेटवर दुखापत झाली आहे. या चित्रपटाचं सध्या वाराणसीत चित्रीकरण सुरु असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ चं लखनौमध्ये चित्रीकरण सुरु होतं. हे चित्रीकरण पार पडल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम पुढील चित्रीकरणासाठी वाराणसीत […]
सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल
हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं चित्रीकरण क्रूमधील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नुकतंच रोखण्यात आलं होतं. यानंतर रजनीकांत यांची कोरोना […]
प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक नारानीपुझा शनावास यांचे ३७ व्या वर्षी निधन
प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक आणि लेखक नारानीपुझा शनावास यांचे निधन झालं आहे. ते ३७ वर्षांचे होते. नारानीपुझा यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना कोची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं. नारानीपुझा त्यांच्या आगामी ‘गांधीराजन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना कोचीमधील केजी रुग्णालयात दाखल […]
रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले, टीमच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण
हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू असलेल्या रजनीकांतच्या ‘अण्णाथे’ चे शूट थांबविण्यात आले आहे. टीमच्या आठ सदस्यांची कोविड -१9 चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रजनीकांत यांची कोविड -१9 चाचणी नकारात्मक आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अभिनेता चेन्नईला परत येईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र रजनीकांत यांनी हैदराबादमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले […]










