मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा मृत्यू झाला आहे. ४८ वर्षीय अनिल केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीसाठी गेले होते. धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे थोडुपुझा इथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सीन संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने ब्रेक घेतला तेव्हा अनिल आपल्या काही मित्रांसह धरणात आंघोळीसाठी गेले. याचवेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. खोल पाण्यात लाटांच्या माऱ्यामध्ये ते अडकले आणि बाहेर पडू शकले नाहीत. अनिल नेदुमगंड यांना पाणबुड्यांच्या मदतीने बाहेर काढून तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.