मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा मृत्यू झाला आहे. ४८ वर्षीय अनिल केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीसाठी गेले होते. धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे थोडुपुझा इथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सीन संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने ब्रेक घेतला तेव्हा अनिल आपल्या काही मित्रांसह धरणात आंघोळीसाठी गेले. याचवेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. […]
टॅग: film
रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले, टीमच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण
हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू असलेल्या रजनीकांतच्या ‘अण्णाथे’ चे शूट थांबविण्यात आले आहे. टीमच्या आठ सदस्यांची कोविड -१9 चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रजनीकांत यांची कोविड -१9 चाचणी नकारात्मक आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अभिनेता चेन्नईला परत येईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र रजनीकांत यांनी हैदराबादमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले […]
अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
मुंबई : द डर्टी पिक्चर या चित्रपटातली अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह तिच्याच अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. आर्याचा मृतदेह तिच्या दक्षिण कोलकाताच्या जोधपूर पार्कमधील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आर्याच्या मृत्यूच्या कर्णाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिच्या मोलकरणीने तिला फोन केला होता. परंतु आर्याने […]



