Stopped shooting of Rajinikanth's film, eight members of the team infected with corona

रजनीकांतच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले, टीमच्या आठ सदस्यांना कोरोनाची लागण

मनोरंजन

हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू असलेल्या रजनीकांतच्या ‘अण्णाथे’ चे शूट थांबविण्यात आले आहे. टीमच्या आठ सदस्यांची कोविड -१9 चाचणी पॉसिटीव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, रजनीकांत यांची कोविड -१9 चाचणी नकारात्मक आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अभिनेता चेन्नईला परत येईल असा अंदाज वर्तविला जात होता, मात्र रजनीकांत यांनी हैदराबादमध्ये स्वत: ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले आहे.

कोरोनामुळे तसेच लॉकडाऊनमुळे थांबलेल्या चित्रपटाचे शूट नुकतेच 15 डिसेंबर रोजी पुन्हा सुरू झाले होते आणि त्याच दिवशी रजनीकांत शूटमध्ये सामील झाले होते. प्रॉडक्शन हाऊसने टीमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने ठरवलेल्या प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत