Superstar Rajinikanth's health suddenly deteriorated and admitted to hospital
मनोरंजन

सुपर‍स्‍टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

हैदराबाद : दाक्षिणात्य सुपर‍स्‍टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाबामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ या चित्रपटाचं चित्रीकरण क्रूमधील सात सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नुकतंच रोखण्यात आलं होतं. यानंतर रजनीकांत यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु त्यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केलं होतं.

अन्नाथे या चित्रपटाचं दिग्दर्शन सिरुथई सिवा करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत