प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक आणि लेखक नारानीपुझा शनावास यांचे निधन झालं आहे. ते ३७ वर्षांचे होते. नारानीपुझा यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना कोची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं.
नारानीपुझा त्यांच्या आगामी ‘गांधीराजन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना कोचीमधील केजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांच्या मेंदूने काम करणं थांबवलं. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना कोची येथील अॅस्टर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram