मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे.
“आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे” असे ट्विट विराट कोहलीने केले आहे
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु




