मुंबई : ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोचा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळताना दीपेश खाली कोसळला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भाभीजी घर पर हैं या मालिकेत दीपेश मलखान सिंगची भूमिका साकारत होता.
शोचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच शोचा अभिनेता वैभव माथूरनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, “हो, तो आता नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही, कारण सांगण्यासारखे काही राहिले नाही.” कविता कौशिक हिनेही दुःख व्यक्त करत ट्विट केलं आहे. ती म्हणाली, “दीपेश भान यांचे काल वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाल्याच्या बातमीने धक्का बसला, दुखावली गेले, एफआयआरमधील एक अतिशय महत्त्वाचा कलाकार, कधीही मद्यपान/धूम्रपान न करणारा किंवा आरोग्यास हानी पोहोचेल असे काहीही न करणारा तंदुरुस्त माणूस, आपल्या मागे पत्नी, एक वर्षाचे मूल, पालक आणि आपल्या सर्वांना सोडून गेला.”
In shock, gutted ,pained with the news of Deepesh Bhan passing away at the age of 41 yesterday, a very important cast member in f.i.r , Was a fit guy who never drank/smoked or did anything to harm his health, left behind a wife n one year old child and parents and us all ?? pic.twitter.com/FVkaZFT3bI
— Kavita Kaushik (@Iamkavitak) July 23, 2022
दीपेशचे 2019 मध्ये लग्न झाले होते
दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर दीपेशने थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेश मुंबईत आला. शोमध्ये मुलींसोबत फ्लर्ट करणाऱ्या दीपेश भानचे खरे तर लग्न झाले होते. त्याचे लग्न मे 2019 मध्ये दिल्लीत झाले होते. जानेवारी २०२१ मध्ये दिपेशला एक मुलगा झाला होता.
अनेक कॉमेडी टीव्ही शोमध्ये काम केले
या शोपूर्वी, अभिनेत्याने बिंदास टीव्हीच्या ‘कॉमेडी का किंग कौन’, ‘कॉमेडी क्लब’, ‘भूतवाला’, ‘एफआयआर’सह ‘चॅम्प’ आणि ‘सुन यार चिल मार’ सारख्या शोमध्ये काम केले आहे. 2007 मध्ये दीपेशने ‘फालतू उटपटांग चटपटी कहानी’ या चित्रपटातही काम केले होते. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता.





