अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला कोरोनाची लागण झाली आहे. रकुल हैदराबादमध्ये अजय देवगन आणि अमिताभ बच्चन अभिनीत आगामी मेडे या चित्रपटाचे शूटिंग करत होती. रकुलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली.
रकुलने ट्विट करत म्हटले कि, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. मला बरे वाटत आहे आणि विश्रांती घेत आहे. मग मला पुन्हा शूटिंगवर लवकरच जाता येईल. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करवून घ्यावी. धन्यवाद आणि कृपया सुरक्षित राहा.”
??? pic.twitter.com/DNqEiF8gLO
— Rakul Singh (@Rakulpreet) December 22, 2020




