The cause of death of actress Arya Banerjee has been revealed

अभिनेत्री आर्या बॅनर्जीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं, रिपोर्टमध्ये समोर आलं मृत्यूचं कारण

मनोरंजन

अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. तिच्या मृतदेहाजवळ मोठ्या प्रमाणात रक्त असल्यामुळे आर्याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यात तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शुक्रवारी आर्याचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आला होता. त्यानंतर तिच्या शवविच्छेदन अहवालात आर्याने मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केलं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तिला हृदयविकाराचा झटका आला होता. आर्याच्या मृतदेहाजवळ आढळून आलेलं रक्तदेखील तिचंच असून जमिनीवर पडल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. दरम्यान, आर्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिला हृदयाशीनिगडीत काही समस्या आणि अन्य आजार होते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तिची हत्या झालेली नाही असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत