Controversial statement made by the chairperson of the women's commission about rape

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बलात्काराविषयी केलं वादग्रस्त वक्तव्य

देश

छत्तीसगढ : बहुतांश मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी करतात, असं वादग्रस्त वक्तव्य छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे. तसेच लिव्ह इन रिलेशन संपल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होत असल्याचंही त्या म्हणाल्या. नायक यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर नायक बोलत होत्या. नायक म्हणाल्या की, “अनेक प्रकरणांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि सहमतीन संबंध ठेवल्यानंतर काही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, तुम्ही आधी नातं समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या अशा रिलेशनशिपमध्ये असाल तर याचा परिणाम अत्यंत वाईट असेल. माझा सल्ला आहे की, जर तुम्ही अल्पवयीन असाल तर कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात अडकू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. आजच्या काळात वयाच्या 18व्या वर्षी लग्न होताना दिसत आहेत. काही वर्षांनी जेव्हा मुलं होतात, त्यानंतर जोडप्यांना एकत्र राहणं अवघड होतं.”

लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला आणि पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत