मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे.
एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी सीमोनशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती आहे. यात अंमली पदार्थांचा उल्लेख आहे. सारा अली खान सुशांतसोबत एका खासगी चार्टर प्लेनने बँकॉकला गेली होती, अशीही माहिती एनसीबीच्या हाती आली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. या कलाकारांच्या ए, बी आणि सी अशा तीन याद्या तयार केल्या आहेत. यातील ए लिस्टमध्ये ज्या कलाकारांची नावं आहेत त्यांची लवकरच चौकशी सुरू होणार आहे.




