Gurmeet and Debina became parents for the second time

7 महिन्यांत दुसऱ्यांदा आईबाबा बनले गुरमीत आणि देबिना

मनोरंजन

मुंबई : अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी 7 महिन्यांनंतर दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. शुक्रवारी (11 नोव्हेंबर) देबिनाने एका मुलीला जन्म दिला. स्वतः गुरमीतने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांचे बाळ प्री मॅच्युअर असून वेळेआधी जन्माला आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुरमीतने देबिनासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “बेबी गर्ल, तुझे या जगात स्वागत आहे. दुसऱ्यांदा पालक झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. यावेळी आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. आमची लहान मुलगी वेळेआधी या जगात आली आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या.” गुर्मितच्या पोस्टवर अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत.

देबिना बॅनर्जी याच वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदा आई झाली, त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी तिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीविषयी जाहीर केले होते. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. एकीकडे देबिनाला तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे ट्रोल केले जात होते, तर दुसरीकडे अनेकजण देबिनाचे कौतुक करत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत