11th grade student commits suicide due to harassment

धक्कादायक : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

महाराष्ट्र

सोलापूर : छेडछाडीला कंटाळून 11वीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाली आहे. या विद्यार्थीनीने  गळफास घेऊन जीवन संपवलं. पंढरपूरच्या शेळवे गावात ही घटना घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात रमेश गाजरे, स्वप्नील कौलघि आणि लहू टेलर यांच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने लिहिलं आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत