दुबई : हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर २१९ रनाचा डोंगर उभा केला आहे. डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी केलेली झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. हैदराबादने केन विल्यमसनला संघात घेत जॉनी बेअरस्टोला संघाबाहेर बसवले. प्रियम […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
हिटमॅन रोहित शर्मा IPL मध्ये पुन्हा दिसणार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळू शकेल
नवी दिल्ली : रोहित शर्माला दुखापत झाली असून तो आयपीएलमधील गेली दोन सामने खेळू शकला नाही. इतक नव्हे तर भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील रोहित शर्माचा विचार केला गेला नाही. रोहितला कसोटी, वनडे आणि टी-२० या तिनही संघातून दुखापतीमुळे वगळण्यात आले पण रोहितने जर फिटनेस सिद्ध केल्यास रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड होऊ शकते. रोहितसह इशांत शर्मा […]
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ
प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष आ.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी साखरेचे उत्पादन वाढवण्यावण्याबद्दल व साखरेला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री आ.श्री. आणासाहेब म्हस्के पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. […]
काश्मीर आणि लडाखमध्ये आता कोणताही भारतीय जमीन खरेदी करू शकेल
केंद्र सरकारने केंद्रशासीत प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर आणि लडाख साठी भूमी कायदा मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी अधिसूचीत केला. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे भारतीय नागरिक जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासीत प्रदेशांमध्ये जमीन खरेदी-विक्री अथवा भाड्याने देण्याचे व्यवहार करू शकतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली. या आदेशाला युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर […]
मेक इन इंडिया : UBON ने लॉन्च केला 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही
UBON ने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च केला आहे. नवीन 40 इंचाचा UBON स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16: 9 स्क्रीन रेशियो आणि 24 वॅटच्या दमदार स्पीकरसह येतो. कंपनीने म्हटले आहे की हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत बनविला गेला आहे. UBON च्या 40 इंचाच्या […]
IPL 2020 : आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना
आयपीएलचा 47 वा सामना दुबईत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता होणार आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हा सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकेल. हैदराबाद संघाने हंगामात आतापर्यंत 11 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून 8 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. अशा […]
हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) यांच्या आईचं निधन
‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ (विकास पाठक) जो आपल्या धाडसी व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे, आज भाऊच्या आईचं दुःखद निधन झालं. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. हिंदुस्थानी भाऊच्या आईचं वयही जास्त होतं. याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही. View this post on Instagram Sad to say that #hindustanibhau Mother Expired today #RIP […]
पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल का? CSK संघाचे CEO विश्वनाथन यांनी दिली माहिती
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL मध्ये पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण या सीझनमध्ये त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. […]
फेसबुकने युझर्ससाठी क्लाऊड गेम केला लॉन्च, अगदी मोफत खेळता येणार
फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असे फेसबुकने स्पष्ट केले. फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम […]
मुंबईत अभिनेत्रीवर चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. […]










