फेसबुकने सोमवारी वेबसाईट युझर्ससाठी मोफत क्लाऊड गेम लॉन्च केला आहे. फेसबुकचा हा नवा गेम फेसबुक वेबसाईट आणि अँड्रॉईड अॅपवर उपलब्ध असेल पण तो अॅपलवर उपलब्ध नसेल. अॅपलच्या काही धोरणांमुळे तो त्यांना उपलब्ध करता येणार नाही, असे फेसबुकने स्पष्ट केले.
फेसबुकने लॉन्च केलेला हा गेम मोबाईल व्हर्जनमध्ये आहे. Asphalt 9: Legends हा गेम 3D रेसर गेम आहे. PGA TOUR Golf Shootout हा 3D गोल्फिंग गेम आहे. माऊस, की-बोर्ड अथवा टचस्क्रीनचा वापर करुन अगदी मोफतपणे ही गेम खेळता येईल. कोणतेही शुल्क लावण्यात येत नसल्याने या गेमचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची आशा फेसबुकला आहे.
Introducing our take on cloud gaming where we hope to make it easier to play games instantly on Facebook Gaming.
Check out the things we’re doing (and not doing) with our new cloud gaming platform via @Jason_Rubin ? https://t.co/bbh00OPK8h pic.twitter.com/QEo86sX9Vl
— Facebook Gaming (@FacebookGaming) October 26, 2020
युझर त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुनच हा गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकतात. हा गेम खेळताना फेसबुकच्या पेजमधून बाहेर पडण्याची गरज नसल्याने युझर फेसबुकच्या पेजवरच राहतील आणि त्याचा उपयोग कंपनीला त्यांचा प्रति व्यक्ती महसूल वाढीसाठी होणार आहे. तसेच जाहिरातीही त्या पेजवर सुरुच राहिल्याने फेसबुकच्या जाहिरातींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. फेसबुकचा 98 टक्के महसूल हा त्यांना मिळणाऱ्या जाहिरातीमधून मिळतो.
या आठवड्यात अमेरिकेच्या काही भागात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीत त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.