Easily You Can Convert Your Sim Prepaid To Postpaid Only Otp Needed
गॅझेट्स तंत्रज्ञान

प्रीपेड सीम पोस्टपेडमध्ये कन्वर्ट करणं झालं सोपं, फक्त एक OTP करणार काम, जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुम्हाला जर तुमचे प्रीपेड सीम कार्ड पोस्टपेड मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर आता या प्रकियेसाठी फक्त एका मिनिटाचा वेळ लागतो. ट्रायने नवीन गाइडलाइन जारी केली असून नवीन नियमानुसार, आता हे काम करण्यासाठी फक्त एका ओटीपीची गरज आहे. त्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड मधून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल. या दरम्यान तुमच्या मोबाइलची सेवा ३० मिनिटापेक्षा जास्त काळ बाधित राहणार नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अशा प्रकारे करू शकता प्रीपेड सीम पोस्टपेड मध्ये कन्वर्ट :

  1. Prepaid सिम Postpaid मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलने SMS, IVRS, किंवा वेबसाइट/अधिकृत App ने Request पाठवावी लागेल.
  2. रिक्वेस्ट मिळाल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक मेसेज येईल. मेसेज मध्ये लिहावे लागेल की, तुम्ही सिम प्रीपेड पासून पोस्टपेड मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी विनंती केली आहे. मेसेज मध्ये एक यूनिक ट्रान्झॅक्शन आयडी असेल. त्या सोबतच एक ओटीपी येईल. ओटीपी एक्सपायर होण्याची वेळ १० मिनिटे असणार आहे.
  3. ओटीपीवरून वैधता केल्यानंतर तुमचे सीम कार्ड प्रीपेड वरून पोस्टपेड मध्ये कन्वर्ट होईल.

तुम्हाला सिम कन्वर्ट होण्याची तारीख सांगितली जाईल

तुम्हाला टेक्स्ट किंवा IVRS द्वारे हे सीम कार्ड कन्वर्ट होण्याची तारीख सांगितली जाईल. यानंतर ठरलेल्या वेळेला तुमचे सीम कार्ड प्रीपेड वरून पोस्टपेड केले जाईल. यासाठी तुमच्या मोबाइलची सेवा ३० मिनिटापेक्षा जास्त काळ बाधित राहणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत