Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately

गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती सुद्धा चोरी करू शकतील. गुगलने प्ले स्टोअरवरील या ९ ऍप्सची ओळख पटवली असून त्यावर बंदी घातली आहे. तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर हे ऍप्स असतील तर तात्काळ डिलीट करा.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Zimperium च्या zLabs च्या शोधकर्त्यांनी फ्लायट्रॅप प्रोग्रामची ओळख केली आहे. हे फेसबुक अकाउंटला हायजॅक करण्याची क्षमता ठेवतात. यावरून हॅकर्स फेसबुक अकाउंटला कंट्रोल करू शकतात. तसेच ईमेल आणि कुकीजला अॅक्सेस करू शकतात. शोधकर्त्यांनी खुलासा केला की, फ्लायट्रॅप जगभरात पसरतोय. अशा ९ धोकादायक अॅप्सची यादी समोर आली आहे.

  1. GG Voucher (जीजी वाउचर)
  2. Vote European Football (वोट यूरोपियन फुटबॉल)
  3. GG Coupon Ads (जीजी कूपन एड्स)
  4. application.app_moi_6 : GG Voucher Ads
  5. com.free.voucher : GG Voucher
  6. Chatfuel (चॅटफ्यूल)
  7. Net Coupon (नेट कूपन)
  8. com.movie.net_coupon : Net Coupon
  9. EURO 2021 Official (यूरो 2021 ऑफिशियल)
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत