onion exports and starting imports
महाराष्ट्र राजकारण

कांदा प्रश्नावर राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये – शरद पवार

नाशिक : कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हटले […]

ISRO and NASA's NISAR satellite
तंत्रज्ञान

संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल ISRO आणि NASA चा ‘निसार’

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO -इस्रो ) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) 2022 या वर्षात एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जो संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच हा उपग्रह त्याबद्दल माहिती देईल. हा जगातील सर्वात महाग पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल. त्याचे नाव निसार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) आहे. त्याची अपेक्षित […]

High profile sex racket raided
महाराष्ट्र मुंबई

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी छापा टाकत केलं उद्ध्वस्त, ३ तरुणींची सुटका

मुंबई : विरारमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट बाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. ग्लोबल सिटी या उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. काल (२७ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इथे छापा टाकत हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. यावेळी पोलिसांनी ३ तरुणींची सुटका देखील केली. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक […]

iPhone users will have to pay more
गॅझेट्स

iPhone युजर्सना धक्का : अॅप्स आणि इन अॅप्स साठी मोजावे लागणार जास्त पैसे

अॅपल आयफोन युजर्ससाठी ही महत्वाची बातमी आहे. लवकरच अॅपल युजर्सना अॅप्स आणि इन अॅप्स खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, साउथ आफ्रिका आणि रशिया यासारख्या ६ देशात Apple App Store आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहे. अॅपलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, टॅक्स वाढल्याने कंपनीने हे पाऊल उचलले आहे. भारतात इंटरनेट कंपन्यांवर […]

overall development and diet of the baby
तब्येत पाणी ब्लॉग

बाळाचा सर्वांगीण विकास व आहार – बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे

बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ. जर तुम्ही […]

decide to start a local for all
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकींग : काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु होणार, मुंबईकरांना मोठा दिलासा

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकल लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, आता सध्या लोकल मधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. एका प्रवाशाने ट्विट करत, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि […]

Most New 4G Users
तंत्रज्ञान

‘या’ टेलिकॉम कंपनीने जोडले सर्वाधिक नवीन 4G यूजर्स

नवी दिल्लीः टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे ४ जी सब्सक्रायबर्स बेस वाढून १५.२७ कोटी झाला आहे. देशाची दिग्गज कंपनी एअरटेलने सांगितले की, या तिमाहीत त्यांनी १.४४ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. तसेच कंपनीचे एव्हेरज रेवेन्यू प्रति युजर सुद्धा १६२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारती एअरटेलने सांगितले कंपनीचे ग्राहक प्रत्येक महिन्याला साधारणपणे १६ जीबी पर्यंत डेटाचा वापर करीत […]

Punchnama of vertical crop damage
महाराष्ट्र राजकारण शेती

उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार

अकोले : पंचनामे सुरु झाले खरे पण फक्त उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल […]

Ready reckoner rate scam
महाराष्ट्र मुंबई राजकारण

रेडी रेकनरच्या दरात मोठा घोटाळा, राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला

मुंबई : महसूल विभागाने मुंबईतील महसूल विभागाच्या जमिनीचे रेडीरेकनरचे दर काही बिल्डरांसाठी ५० टक्यांपेक्षा कमी करून राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. यात सुमारे १० हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली आहे. मुंबईतील जमिनीचे रेडीरेकनरचे दर हे दरवर्षी १.७४ […]

Sunrisers Hyderabad win by 88 runs
क्रीडा

IPL 2020 : SRH vs DC सनरायजर्स हैदराबादचा ८८ धावांनी विजय

दुबई : सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सनरायजर्स हैदराबादने स्पर्धेतील […]