Ready reckoner rate scam
महाराष्ट्र मुंबई राजकारण

रेडी रेकनरच्या दरात मोठा घोटाळा, राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला

मुंबई : महसूल विभागाने मुंबईतील महसूल विभागाच्या जमिनीचे रेडीरेकनरचे दर काही बिल्डरांसाठी ५० टक्यांपेक्षा कमी करून राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. यात सुमारे १० हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईतील जमिनीचे रेडीरेकनरचे दर हे दरवर्षी १.७४ टक्क्याने वाढवले जातात. पण यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महसूल विभागाने काही जमिनीचे दर बिल्डर आणि जमीनमालकांना फायदा करून देण्यासाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी केले आहेत, असा साटम यांचा आरोप आहे. जर एखाद्या भागाचा व जमिनीचा रेडीरेकनर कमी असेल तर प्रीमियम आणि विविध कर हे बिल्डरला कमी भरावे लागतात. पण महसूल विभागाने बिल्डर आणि जमीनमालकांच्या फायद्यासाठी रेडीरेकनरचे दर कमी केले. यात सुमारे १० हजार कोटींचा राज्याचा महसूल या विभागाने बुडवला आहे. त्यामुळे या रेडीरेकनर घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी साटम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत