मुंबई : विरारमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट बाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. ग्लोबल सिटी या उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. काल (२७ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास इथे छापा टाकत हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. यावेळी पोलिसांनी ३ तरुणींची सुटका देखील केली. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेला आणि पुरुषाला अटक करण्यात आली आहे.
याच परिसरात आणखी एका इमारतीमध्ये आरोपी महिलेने एक घर भाड्याने घेतले होते. या घरात देखील तिने वेश्या व्यवसाय सुरु केला होता. मात्र, याबाबत नालासोपारा पोलिसांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एक बोगस गिऱ्हाईक पाठवला. पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ या घरावर छापा टाकत हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं. यावेळी तीन तरुणींची सुखरुप सुटका करण्यात आली. या प्रकरणात एका महिला आणि पुरुषावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सेक्स रॅकेट चालविण्यात आणखी कुणाचा हात आहे का हे देखील पोलीस तपासून पाहत आहेत.