भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO -इस्रो ) आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) 2022 या वर्षात एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे जो संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवेल. म्हणजेच आपत्ती येण्यापूर्वीच हा उपग्रह त्याबद्दल माहिती देईल. हा जगातील सर्वात महाग पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल. त्याचे नाव निसार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar – NISAR) आहे. त्याची अपेक्षित किंमत सुमारे 10 हजार कोटी असेल.
हा उपग्रह लॉन्च झाल्यानंतर तूफान, ज्वालामुखी, पृथ्वीवरील कवच, भूकंप, ग्लेशियर्स वितळणे, सागरी वादळ, जंगलातील आग, समुद्रातील पाणी पातळीतील घट किंवा वाढ, पावसाळी संकटे अशा सर्व प्रकारच्या आपदा ज्याची आपण कल्पना करू शकता, या सर्वांची माहिती निसार अगोदरच देईल. यासह हा वेळोवेळी अंतराळात जमा होणारा कचरा आणि अंतराळातून पृथ्वीवर येणा-या धोक्यांविषयीही माहिती देईल.
इस्रो आणि नासा एकत्रितपणे ‘स्पेस सिचुएशनल अवेयरनेस’ नावाचा प्रकल्प करत आहेत, ज्या अंतर्गत निसार (NISAR) लाँच केला जाईल. एल आणि एस असे दोन प्रकारचे बँड असतील. या दोन्ही गोष्टी पृथ्वीवरील वृक्ष आणि वनस्पतींच्या कमी जास्त होणाऱ्या संख्येवर लक्ष ठेवतील तसेच प्रकाशाचा अभाव आणि अधिक मिळण्यामुळे होणाऱ्या परिणामाचा देखील अभ्यास करेल.
त्याचे रडार इतके सामर्थ्यवान असेल की तो 240 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्राची स्पष्ट छायाचित्रे घेण्यास सक्षम असेल. तो 12 दिवसांनंतर पुन्हा पृथ्वीवरील त्याच ठिकाणांचा फोटो घेईल. कारण पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यास त्याला 12 दिवस लागतील. या काळादरम्यान, तो पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागांचे जलद नमूने घेऊन वैज्ञानिकांना छायाचित्रे आणि डेटा प्रदान करत राहील.
असे मानले जाते की प्रक्षेपणानंतर हा उपग्रह कमीतकमी 5 वर्षे काम करत राहील. या काळात ज्वालामुखी, भूकंप, भूस्खलन, जंगल, शेती, ओली जमीन, पर्माफ्रॉस्ट, बर्फ कमी अधिक होणे, इत्यादी विषयांचा अभ्यास निसारच्या माध्यमातून केला जाईल. तसेच, अशा नैसर्गिक आपत्तींपासून लोकांना वाचविण्यात देखील मदत होईल.
हा उपग्रह तयार करण्यासाठी इस्त्रोच्या अहमदाबाद स्पेस एप्लीकेशन सेंटर मधील तपन मिश्रा, मनब चक्रबर्ती, राजकुमार, अनूप दास आणि संदीप ओझा हे पाच शास्त्रज्ञ मदत करत आहेत. हे सर्व नासाला पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या नैसर्गिक बदलांचा अभ्यास करण्यास मदत करतील.
निसार उपग्रहात मोठी मुख्य बस असणार आहे, जी अनेक उपकरणांनी सुसज्ज असेल. तेथे बरेच ट्रान्सपॉन्डर, दुर्बिणी आणि रडार प्रणाली देखील असतील. याव्यतिरिक्त, त्यातून एक आर्म बाहेर येईल, ज्याच्या वर सिलिंडर असेल. लॉन्च झाल्यानंतर काही तासांनंतर हे सिलिंडर उघडले की डिश अँटेनासारखी मोठी छत्री बाहेर येईल. ही छत्रीच सिंथेटिक अपर्चर रडार आहे, जी पृथ्वीवर होत असलेल्या नैसर्गिक क्रियांची इमेजिंग करेल.
या उपग्रहाच्या प्रक्षेपणासंदर्भात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकेल आर. पोम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क टी. एस्पर यांनी करार केला आहे.