Samsung Galaxy A71
गॅझेट्स तंत्रज्ञान

सॅमसंगचा स्मार्टफोन Samsung Galaxy A71 झाला स्वस्त

सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A71 च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत लाँच करण्यात आलेल्या या फोनने भारतीय बाजारात मिड रेंज स्मार्टफोनमध्ये आपली जागा बनवली होती. सॅमसंग स्मार्टफोनची ए सीरीज खूप प्रसिद्ध आहे.

Samsung Galaxy A71 ची वैशिष्ट्ये :

  1. या फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे.
  2. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० ऑक्टाकोर प्रोसेसर
  3. स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. तसेच २५ वॉट सुपर फास्ट चार्जिंग दिली आहे.
  4. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड १२३ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यू सोबत येतो. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि रियर कॅमेरा ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत