वीवोने आज (सोमवार) आपला नवीन Vivo Y51 भारतात लॉन्च केला. विवोच्या या नवीन फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo Y51 मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे. Vivo Y51 भारतीय बाजारात 17,990 रुपयांत दाखल करण्यात आला आहे. हा फोन टायटॅनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये उपलब्ध आहे.
Vivo Y51 स्पेसिफिकेशन्स :
- Vivo Y51 मध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी + हॅलो फुलव्यू एलसीडी डिस्प्ले आहे.
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.
- यात अँड्रॉइड 11 बेस्ड फनटच ओएस 11 आहे.
- Vivo Y51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे तीन सेन्सर आहेत. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.
- विवोच्या या फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी दिलेली आहे जी 18 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा असा दावा आहे की बॅटरी 14.3 तास ऑनलाइन एचडी मूव्ही स्ट्रीमिंग प्रदान करू शकते आणि 7.26 तास गेमिंग टाइम देऊ शकते.
- कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
- एका बाजूने फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा देण्यात आलेला आहे.