Ulefone launches smartphone Ulefone Armor 12

मस्तच..! ‘या’ कंपनीने लाँच केला पडल्यावरही न फुटणारा स्मार्टफोन, यूजर्सला ठेवणार बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित..

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली :  Ulefone कंपनीने Ulefone Armor 12 या स्मार्टफोनला मजबूत बॉडीसह लाँच केले आहे. त्यामुळे या फोनला आर्मर असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये सिल्वर-इयॉन बेस्ट ऐडिटिव्हसवर आधारित एक अँटी बॅक्टेरियल कोटिंग आहे. जे यूजर्सला बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून सुरक्षित ठेवते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आर्मर १२ चे स्पेसिफिकेशन्स : 

 1. Ulefone Armor 12 मध्ये क्वाड-रियर कॅमेरा
 2. रियरला ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर
 3. ८ मेगापिक्सल वाइड-अँगल लेंस
 4. २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर, जो बोकेह इफेक्ट देईल.
 5. ड्यूल १२१६ सुपर-लीनिय स्पीकर्स दिले आहेत, जे ७ मॅग्नेट्स साउंड यूनिट आणि १०६डीबी साउंड लाउडनेससह येते.
 6. सॉफ्टवेअरला फाइन-ट्यूनिंगच्या १५ स्तरांसोबत ऑप्टिमाइज
 7. ५ जी कनेक्टिव्हिटीसह मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट
 8. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज
 9. १८ वॉट फास्ट चार्जिंग आणि १५ वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ५१८० एमएएच बॅटरी
 10. ६.२ इंच डिस्प्ले
 11. वायरलेस पेमेंटसाठी एनएफसी कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सिस्टम
 12. अँड्राइड ११ ओएस

Ulefone Armor 12 या स्मार्टफोनच्या लाँचिग निमित्ताने कंपनी सोशल मीडिया अकाउंट्सवर गिवअवे देत आहे. यात भाग घेऊन मोफत गिफ्ट्स जिंकण्याची संधी आहे. गिवअवे इंस्टाग्रामवर १३ ऑगस्ट, युट्यूबवर १८ ऑगस्ट आणि अलीएक्सप्रेसवर २३ ऑगस्टपासून आयोजित केले जात आहे. Ulefone Armor 12 ५ जी चा प्री-सेल २३ ऑगस्टपासून सुरू होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत