Techno Spark 6 Air

टेक्नो स्पार्क 6 Air चा जास्त स्टोरेज असलेला नवीन व्हेरियंट भारतात लाँच

गॅझेट्स तंत्रज्ञान

टेक्नो स्पार्क 6 Air चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरा व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कंपनीने नवीन व्हेरियंट ९ हजारांत लाँच केले आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी व्हेरियंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. टेक्नो स्पार्क ६ एयरचे नवीन व्हेरियंट २५ सप्टेंबर पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे.

टेक्नो स्पार्क ६ एअरचे फीचर्स :

  1. या फोनमध्ये ७ इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.
  2. रिझॉल्यूशन 720×1640 पिक्सल
  3. फोन अँड्रॉयड १० गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो.
  4. या व्हेरियंटमध्ये ३ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते.
  5. फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली आहे.
  6. मीडियाटेक ए२२ प्रोसेसर
  7. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  8. कनेक्टिविटीसाठी यात 4G LTE, ड्यूल-बँड वायफाय, ब्लूटूथ v5.0 दिला आहे.
  9. फोनमध्ये मागच्या बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत