decide to start a local for all

लोकल प्रवासासाठी 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढले पास, रेल्वेकडून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून स्टेशनवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. 11 ऑगस्टपासून एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 197 नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. मध्य रेल्वेच्या डोंबिवली तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वाढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या 1612 फेऱ्या सुरु आहेत. त्या वाढवून 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 1201 लोकल फेऱ्या वाढवुन 1300 करण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्या सोमवारपासून चालवल्या जातील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत