earthquake shakes Haiti

हैती देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप, आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू तर 2800 जण गंभीर जखमी

ग्लोबल

हैती : हैती या कॅरेबियन देशात 7.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत 724 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2800 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. अनेकजण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भूकंपामुळं उद्भवलेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येते आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणात रात्रभर रस्त्यावरच होते.

त्यातच ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकण्याची अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करण्यात येणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत