multiple credit cards what are its advantages and disadvantages how to use multiple credit card together
अर्थकारण देश

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरताय? अनेक क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या…

नवी दिल्ली : तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. अनेक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला काही वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर कार्डधारकांनी कार्डवर सतत नजर ठेवली नाही, तर ते कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जर आपल्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील, तर त्यांचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने अनेक क्रेडिट कार्ड ठेवू नयेत. तसेच, व्यक्तीकडे योग्य कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याबरोबरच त्याचा योग्य वापर करणे देखील आवश्यक असते. त्यासाठी अधिक रिवॉर्ड पॉइंट किंवा ऑफर देणारे कार्ड निवडावे. तसेच क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी केल्यास ते चांगले आहे, त्याचा वापर गुणोत्तर राखणे महत्वाचे असते. वापरकर्त्याने एका वेळी 30-40 टक्क्यांपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा वापरू नये. वापरकर्त्याकडे वेगवेगळी क्रेडिट कार्ड असू शकतात, पण जर ती 20-30 टक्के वापरली गेली तर ते चांगले आहे. जर कार्ड 80 टक्के ते 90 टक्के वापरले गेले, तर हे दर्शवते की वापरकर्ता कर्जासाठी भुकेला आहे. अशा प्रकारे कार्ड्सची संख्या महत्त्वाची नाही, तर कार्डचा वापर किती करायचा ते महत्वाचे ठरते.

वेळेवर पेमेंट आवश्यक :
एखाद्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील तर ते ठीक आहे, परंतु जर या कार्डचे पेमेंट वेळेवर भरले गेले नाही, तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. क्रेडिट कार्डचे पेमेंट दिलेल्या तारखेच्या आत केल्यास क्रेडिट कार्डवरील उशीरा शुल्क (late charges) टाळता येऊ शकते. यासाठी आपण फोनवर मंथली रिमाइंडर लावून ठेवू शकता. जर वापरकर्त्यांनी त्यांचे खर्च आणि परतफेड करण्याची योग्य योजना आखली, तर कार्डांच्या संख्येने काही फरक पडत नाही. वापरकर्ता कार्ड वापरून खर्च केलेली रक्कम वेळेत भरण्यास सक्षम असणे आवश्यक असते.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा?
क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे फार महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही कर्जाखाली दबून जाऊ शकता.

  1. एका क्रेडिट कार्डपेक्षा 2-3 कार्ड असणे चांगले आहे, परंतु त्यापेक्षा जास्त कार्ड बाळगू नका.
  2. आजीवन विनामूल्य क्रेडिट कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करा, ज्यात वार्षिक शुल्क भरावे लागत नाही. अनेक मोठ्या बँकाही अशी कार्ड देतात.
  3. एकापेक्षा जास्त कार्ड घेताना, फक्त एक विनामूल्य व्हाउचर पाहू नका, तर ते अतिरिक्त कार्ड आपल्याला दीर्घकाळात कसे लाभ देऊ शकते ते पहा.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत