नवी दिल्लीः टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे ४ जी सब्सक्रायबर्स बेस वाढून १५.२७ कोटी झाला आहे. देशाची दिग्गज कंपनी एअरटेलने सांगितले की, या तिमाहीत त्यांनी १.४४ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. तसेच कंपनीचे एव्हेरज रेवेन्यू प्रति युजर सुद्धा १६२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
भारती एअरटेलने सांगितले कंपनीचे ग्राहक प्रत्येक महिन्याला साधारणपणे १६ जीबी पर्यंत डेटाचा वापर करीत आहेत. जे बेस्ट इन क्लास आहे. कंपनीचा दावा आहे की ते २ लाखांहून जास्त टॉवर्स द्वारे ग्राहकांना जबरदस्त अनुभव देत आहेत. जर व्हाइस कॉलिंचा विचार केला तर युजर्सने या तिमाहीत दर महिन्याला १००५ मिनिट्सचा वापर केला आहे.
कंपनीची ब्रॉडबँड आणि फायबर टू द गेम सर्विसने वर्षाच्या आधारावर ७.३ टक्के ग्रोथ मिळवली आहे. एअरटेलने दुसऱ्या तिमाहीत १.२९ लाख नवी नवीन ब्रॉडबँड युजर्स जोडले आहेत. यामुळे कंपनीच्या एकूण ब्रॉडबँड सब्सक्रायबर्सची संख्या २.८ लाख झाली आहे. तसेच कंपनीने ५.४९ लाख नवीन डायरेक्ट टू होम (डीटीएच) युजर्स जोडले आहे. याला एअरटेल टीव्हीचे युजरबेस १.६८ कोटी वरून वाढून ते ते १.७४ कोटी झाली आहे. तसेच एअरटेलच्या विंक प्लॅटफॉर्मने ५.९३ कोटी मंथली अॅक्टिव युजर्सची संख्या गाठली आहे.