Samsung Galaxy M21s smartphone
तंत्रज्ञान

Samsung Galaxy M21s स्मार्टफोन लाँच

Samsung Galaxy M21s स्मार्टफोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाची कंपनी गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन आहे. गेल्या महिन्यात भारतात लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चे हे रिब्रँडेड व्हर्जन आहे. दोन्ही फोन मध्ये स्टोरेजचा फरक आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Samsung Galaxy M21s ची किंमत ब्राझीलमध्ये जवळपास २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसह येतो. गॅलेक्सी एफ ४१ ला ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची सुरुवातीची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. गॅलेक्सी एम २१s ब्लॅक कलरमध्ये येतो.

Samsung Galaxy M21s चे स्पेसिफिकेशन्स :

  1. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे.
  2. फोनमध्ये ऑक्टा कोर अक्सिनॉस ९६११ प्रोसेसर दिला आहे.
  3. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
  4. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
  5. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे.
  6. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत