मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकल लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, आता सध्या लोकल मधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
एका प्रवाशाने ट्विट करत, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे” अशी खंत व्यक्त केली.
यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ” असं सांगितलं. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असंही ते म्हणाले आहेत.
Dear Sir @CMOMaharashtra @OfficeofUT
Earlier Women allowed to travel in Mumbai Locals. Now Lawyers allowed too. Why disallow businessmen employees common man❓ Its BIG INJUSTICE to block @mumbairailusers in Diwali season.@PiyushGoyal @AUThackeray @VijayWadettiwar @DrSEShinde pic.twitter.com/TeaiOEe3Qd
— M. K. Ludhwani (@m_ludhwani) October 27, 2020




