Arnab Goswami cannot be arrested in this case the supreme court clarified
देश

या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केली जाऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट

रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयानं दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केली जाऊ शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अर्णव […]

woman raped
नागपूर महाराष्ट्र

धक्कादायक घटना : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार

सहकारी बँकेतील एजंटने मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नागपूर मध्ये नंदनवन भागात घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी हितेश आगासे (वय २८, रा. बाभुळबन, लकडगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. डेली कलेक्शनसाठी हितेश महिलेच्या ऑफिसमध्ये यायचा. त्यामुळे दोघांची ओळख […]

Royal Enfield Meteor 350
तंत्रज्ञान

Royal Enfield : रॉयल एनफील्डने Meteor 350 भारतात केली लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

रॉयल एनफील्डने Meteor 350 लाँच केली आहे. आज (६ नोव्हेंबर) व्हर्च्यूअल लाँच इव्हेंटमध्ये ह्या बाईकच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. Fireball, Stellar आणि Supernova यासारख्या 3 व्हेरियंटमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. Meteor ३५० ची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. Royal Enfield Meteor 350 ची सुरुवातीची व्हेरियंट Fireball ची किंमत १ लाख ७५ हजार […]

UV-360 sanitizer module robot
तंत्रज्ञान महाराष्ट्र

रोबोट करणार कोविड निर्जंतुकीकरण, UV-360 सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे ई-उद्घाटन

कोविडचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात महाराष्ट्र राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. उदय सामंत म्हणाले कि, रुग्णालये, […]

Money transfer from Whatsapp
तंत्रज्ञान

वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर

पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी […]

Suicidal behavior with police officers
पुणे महाराष्ट्र

पोलीस अधिकाऱ्याशी जीवघेणं वर्तन; बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास

पिंपरी चिचंवड : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसेनात. आज पोलीस अधिकाऱ्याशीच जीवघेणं वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास एका चालकाने बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओदेखील समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील कार चालकाने गाडी थांबवली नाही. […]

Mumbai Indians enter final by beating Delhi
क्रीडा

दिल्लीचा धुव्वा उडवत मुंबईचा दणदणीत विजय; मुंबईची फायनलमध्ये धडक

IPL 2020 MI vs DC: दिल्ली विरूद्ध मुंबई  सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं १४३ धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात […]

Guidelines for Diwali 2020
महाराष्ट्र

यंदाची दिवाळी फटाक्यांविनाच ; दिवाळी पहाटेवरही बंदी, जाणून घ्या दिवाळी मार्गदर्शक सूचना..

मुंबई : गृह विभागाकडून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली. अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील. दिवाळी मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे […]

heavy rains will get compensation from next week
महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसान भरपाईचे पैसे मिळणार

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून नुकसानभरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. पदवीधर शिक्षक मंडळाच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येत होता. मात्र, राज्य सरकारने निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आज पत्र पाठवले आहे. उद्यापर्यंत त्यांच्याकडून मदतीचे वाटप करण्यासाठी परवनागी मिळेल. त्यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत […]

Delhi Capitals won the toss
क्रीडा

दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना […]