Royal Enfield Meteor 350
तंत्रज्ञान

Royal Enfield : रॉयल एनफील्डने Meteor 350 भारतात केली लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

रॉयल एनफील्डने Meteor 350 लाँच केली आहे. आज (६ नोव्हेंबर) व्हर्च्यूअल लाँच इव्हेंटमध्ये ह्या बाईकच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. Fireball, Stellar आणि Supernova यासारख्या 3 व्हेरियंटमध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. Meteor ३५० ची बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Royal Enfield Meteor 350 ची सुरुवातीची व्हेरियंट Fireball ची किंमत १ लाख ७५ हजार ८२५ रुपये आहे. तर स्टेलर व्हेरियंटची किंमत १ लाख ८१ हजार ३४२ रुपये आहे. टॉप मॉडल व्हेरियंट सुपरनोवाची किंमत १ लाख ९० हजार ५३६ रुपये आहे. Meteor 350 बाईक 7 कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यात एक्क्लूसिव स्टेलर ब्लॅक मैट, फायरबॉल यलो, फायरबॉल रेड, स्टेलर रेड मेटॅलिक, स्टेलर ब्लू मेटॅलिक, सुपरनोवा ब्राउन और सुपरनोवा ब्लू हे कलर समाविष्ट आहेत.

Royal Enfield Meteor 350 चे फीचर्स :

  1. Royal Enfield Meteor 350 मध्ये BS6 कंप्लायंट 349 cc चे एयर कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. जे 20.5hp ची पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते.
  2. ५ स्पीड गियरबॉक्स सोबत लॉन्च
  3. मीटियर ३५० मध्ये पहिल्यांदा रॉयल एनफील्ड ने स्मार्ट कनेक्टिविटी दिली आहे. आता रॉयल एनफील्ड अॅपच्या मदतीने फोनला कनेक्ट करू शकाल. फोनने नेविगेशन कनेक्ट करून इंस्ट्रूमेंट क्लस्टर मध्ये पाहिले जावू शकते.
  4. रॉयल एनफील्ड मीटियर ३५० च्या डिजिटल एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर मध्ये तुम्हाला गियर पोजिशन सोबत odometer, fuel gauge, ट्रिप मीटर आणि सर्विस रिमाइंर यासारखे फीचर्स पाहता येतील.
  5. डुअल चॅनल ABS
  6. Royal Enfield Meteor 350 च्या बाकी फीचर्स मध्ये ट्विन शॉक अब्जॉर्बर, LED DRL चे सर्कुलर हेलोजन हेडलेंप, LED टेल लँप आणि 41एमएम टेलिस्कोपिक फोर्क्स दिले आहेत. ह्या बाईकची सीट सुद्धा खूप आरामदायक आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत